नुकताच या रविवारी लोहगडला जाऊन आलो. शिवाजी महाराजांचा ज्या किल्ल्यांशी खूप जवळून संबंध आला अश्या किल्ल्यांपैकी लोहगड हा एक होय. लोहगडाचा स्थापना काळ जरी निश्चित उपलब्ध नसला तरी सातवाहन काळापासून त्याच्यासंबाधात उल्लेख सापडतात. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे, व मुघल अश्या या भागावर सत्ता गाजवलेल्या सर्व एत्तदेशीय व परदेशी सत्तांकडे हा किल्ला होता. परिणामी याच्या बांधणीत सर्वच स्थापत्य प्रकारांचा वापर दिसून येतो. तत्कालीन किल्ले बांधणी शास्त्राची कल्पना येण्यासाठी लोहगड एकदा अवश्य पाहावा.
कसे जाल:
पुण्याहून ट्रेनने मळवली स्टेशनला उतरावे व भाजे गावात चालत यावे. येथून पुढे साधारणपणे १.३० तासात आपण पायथ्याच्या लोहगडवाडीत पोहचतो. जर स्वताच्या वाहनाने जायचे असेल तर पुणे, कामशेत, पवनानगर, दुधीवारे व लोहगडवाडी असे जाता येते. मुंबईहून यायचे असल्यास मुंबई, लोणावळा, दुधीवारे व पुढे लोहगडवाडी असे जाता येते.
लोहगड हा समुद्रसपाटीपासून ३४०० फुट उंचीवर आहे. लोहगडवाडीतून किल्यावर येताना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व शेवटी महादरवाजा लागतो. महाद्वारावर शरभाचे सुंदर शिल्प दोन्ही बाजूस कोरलेले आहे. गणेश दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूस एक शिलालेख दिसतो. आता तो स्पष्ट दिसत नाही परंतु, नाना फडणवीस यांच्या आदनेनुसार धोंडोपंत नित्सुरे यांनी हे काम केले आस काहीसा तो मजकूर आहे. नारायण व हनुमान दरवाज्यांच्या बाजूला धान्य साठवण्यासाठी कोठ्या केलेल्या आढळतात. जरी यांना धान्य कोठ्या म्हणत असले तरी यांचा वापर बहुपयोगी होत असावा असे वाटते. महाद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूस दर्गा दिसतो. दर्ग्याच्या बाजूसच सदरेचे अवशेष दिसतात. ते पाहून उजव्या हताने पुढे गेल्यावर वाटेत डाव्या बाजूस पाण्याची टाकी व धान्य कोठारे दिसतात. ते पाहून सरळ पुढे गेल्यावर लक्ष्मी कोठी(लोमेश ऋषींची गुहा) दिसते. असे सांगतात कि लोमेश ऋषींनी येथे तप केले होते व त्यांच्याच नावावरून पुढे लोहगड हे नाव रूढ झाले. लक्ष्मी कोठी पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस बालेकिल्ला व समोर दर्गा दिसतो. दर्गा पाहून पूर्वेस गेल्यावर पाण्याचे मोठे टाके लागते. ते पाहून उत्तरेकडे वळावे व विन्चुकात्याच्या दिशेने चालू लागावे. ५ मिनिटे चालल्यावर छोटासा कातळ टप्पा उतरून आपण विन्चुकाट्याच्या सोंडेवर पोहोचतो. विन्चुकाटाहा प्रतापगडाच्या अफझल बुरुजासारखा दिसतो. हा बुरुज चिलखती बुरुज आहे. याला दुहेरी तटबंदीने संरक्षित करण्यात आले आहे. याच्या उत्तर टोकास जाऊन कडेलोटाची जागा पाहून परत फिरावे. कातळ टप्पा चढून पुढचा बुरुज पार केल्यावर उजव्या हाताने पुढे जावे. जवळच १६ कोणी तलाव आहे. हा पूर्णपणे बांधीव असून याला मोट चालवण्याची सोय आहे. पाणी सर्वत्र फिरवण्यासाठी तिचा वापर होत असावा. पायऱ्या उतरताना डाव्या बाजूस एक शिलालेख आहे. ते पाहून पुढे डाव्या हातास बाले किल्ल्यावरील दर्गा पाहावा व दक्षिणेस समोरच दिसणाऱ्या शिवमंदिराकडे उतरावे. शिवमंदिराच्या अलीकडे एक अष्टकोनी तलाव आहे व त्याच्या पशिमेस पाण्याची टाकी आहेत. मंदिरापासून पुढे दर्ग्याजवळ उतरावे व गडफेरी पूर्ण करावी.
थोडा इतिहास:
सातवाहन काळातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या ह्या किल्ल्याचा इतिहास २००० वर्षे मागे जातो. नाणे मावळ, कोरबारसे मावळ, व आंदर मावळावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. यादावांकडून बहामनी राज्याच्या ताब्यात हा किल्ला आला. बहामनी राज्याची शाल्कले होऊन ज्या पाच शाह्या निर्माण झाल्या त्यातील निजामशाहीकडे हा किल्ला सन १४८९ साली गेला. १६३०पर्यन्त तो निजामशाहीत होता. सातवा निजाम दुसरा बुर्हाण इथे काही काळ कैदेत होता. १६३० साली हा किल्ला आदिलशाहीकडे आला. पुढे १६४८ साली शिवाजी महाराजांनी तो काबीज केला. १६६५ मध्ये मिर्झ्हा राजेंनी जेव्हा पुरंदरला वेध दिला तेव्हा मोठी फौज देवून त्यांनी कुत्तुबुद्दिन खानास लोहगडावर पाठवले. तो किल्ला काही घेवू शकला नाही पण त्याने या भागात मोठी जाळपोळ केली व लूट घेऊन निघून गेला. किल्ल्यात आसलेल्या शिबंदीने त्याच्यावर हल्ला केला पण तो निष्फळ ठरला. पुढे पुरंदर तहानुसार हा किल्ला मुघलांकडे गेला. पुढे १६७० साली मुघलांनी तह मोडल्यावर महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला. महाराजांनी सुरात लुटून येताना काही लूट या किल्ल्यावर ठेवली होती. पुढे १७०० साली मुघलांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. पुढे शाहू राजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला असल्याचे उल्लेख सापडतात. पुढे १८१८ साली पेशवाई बुडाल्यानंतर लोहगड, विसापूर, कोरीगड हे किल्ले कर्नल प्रोथरने जिंकून घेतले. त्याने प्रथम विसापूर घेतला व त्यावर तोफा चढवल्या आणि एकही गोळी न झाडता त्याला लोहगड मिळाला. असा हा लोहगड एकदा अवश्य भेट स्यावा असा आहे.